
5 तासांपूर्वी
सिडको (नाशिक) : शिवसेना नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी हे प्रभागात उत्तम काम करीत असून त्यांच्या वॉर्डात मोदी जरी उभे राहिले तरी सूर्यवंशी निवडून येथील, असा आत्मविश्वास शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शनिवारी (ता.२०) खा. राऊत यांच्या हस्ते नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले.
तब्येत बरी नसतानाही कार्यक्रमाला हजर
श्री. राऊत पुढे म्हणाले, तब्येत बरी नसतानाही सूर्यवंशी यांच्या आग्रहाखातर कार्यक्रमाला आलो. आज इतरही काही कार्यक्रम आहेत. पण तुमचा कार्यक्रम हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. डी. जी. सूर्यवंशी यांचे संपूर्ण कुटुंब शिवसेना पक्षात रमले आहे, असे विधान श्री. राऊत यांनी करून सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची स्तुती केली. नाशिक महापालिकेत शिवसेनेचे या वेळी १०० नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. प्रास्ताविकात प्रभाग २८ चे शिवसेना नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी आपला जीवन प्रवास उलगडून सांगितला. तसेच प्रभागात केलेलेल्या कोट्यवधींच्या विकासकामांची माहिती दिली. तब्येत बरी नसतानाही खा. राऊत कार्यक्रमाला आले म्हणून त्यांनी त्यांचे आभारदेखील मानले.
हेही वाचा: जोरदार टीकेनंतर 3 दिग्गज नेत्यांच्या मनमोकळ्या गप्पा! चर्चेला उधाण
या वेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. माधवी सूर्यवंशी यांनी खासदार राऊत यांचे औक्षण केले. श्री. सूर्यवंशी यांनी त्यांना चांदीची तलवार भेट स्वरूपात दिली. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, विनायक पांडे, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, नगरसेवक दीपक दातीर, प्रभाग सभापती सुवर्णा मटाले, नगरसेविका रत्नमाला राणे, संगीता जाधव, अमोल जाधव, शंकर सूर्यवंशी, माधवी सूर्यवंशी, रीना सूर्यवंशी, नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: कापसाचे भाव दीड पट, परतीच्या पावसाने उत्पादन मात्र निम्म्यावर
Esakal