
5 तासांपूर्वी
डोंबिवली : कोविड नियम, तसेच जमावबंदीचे आदेश (corona restrictions) असतानाही डोंबिवलीत (dombivali) भाजपच्या (bjp) वतीने जनआक्रोश मोर्चा (people strike) गुरुवारी काढण्यात आला होता. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह २७ जणांवर गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे.
हेही वाचा: अँटिलिया स्फोटक प्रकरण : आरोपी नरेश गोरला याला सशर्त जामीन मंजूर
पोलिसांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक रणजित जोशी, विशू पेडणेकर, नंदू जोशी, खुशबू चौधरी, आदींसह २७ जणांवर जमावबंदी, कोविड नियम डावलून गर्दी करणे आणि नोटीस दिलेली असतानाही विनापरवानगी मोर्चा काढणे आदी कलमान्वये गुन्हे नोंदविले आहेत.
Esakal