DRDO मध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो पदांसाठी होतेय भरती!

DRDO मध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो पदांसाठी होतेय भरती!

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defense Research and Development Organization – DRDO) ने कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. एकूण 11 पदांवर नियुक्‍त्या करायच्या आहेत. भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), इलेक्‍ट्रॉनिक्‍स (Electronics), मेकॅनिकल (Mechanical) आणि इतर विषयांसाठी ही भरती (Recruitment) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा: पीएचडीच्या मौखिक परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या!

ही पदे संरक्षण प्रयोगशाळा, जोधपूर (राजस्थान) DRDO प्रोजेक्‍टसाठी भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते DRDO च्या अधिकृत वेबसाइट @drdo.gov.in वर जाऊन तपशील तपासू शकतात. यासह इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 डिसेंबर 2021 पासून नियोजित वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहू शकतात.

जाणून घ्या पात्रता…

भौतिकशास्त्र (फिजिक्‍स) विषयासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे M.Sc सह कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून PG पदवी असणे आवश्‍यक आहे. याशिवाय उमेदवारांनी CSIR-UGC NET आणि GATE परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच M.Sc रसायनशास्त्रात प्रथम श्रेणी असणे आवश्‍यक आहे. यासोबतच उमेदवार नेट उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. यासोबतच केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई, बीटेक असणे आवश्‍यक आहे. तसेच इंडस्ट्रियल केमिस्ट्रीसह इतर विषयांमध्ये नेट किंवा गेट उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: आईवडिलांना वाटले की मुलगी इंजिनिअर किंवा डॉक्‍टर होईल, पण..!

मेकॅनिकल विषयासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण झालेले असावेत. यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये BE / B.Tech यामध्ये प्रथम श्रेणी असणे आवश्‍यक आहे. तसेच उमेदवार NET / GATE पात्र असावेत. पुढे अधिकृत वेबसाइटवरील अधिसूचना पाहिल्यानंतरच उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, मुलाखतीला जाताना उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्‍यक आहे, कारण कोणतेही कागदपत्र चुकले किंवा चुकीचे आढळले तर तुमचा उमेदवारी अर्ज नाकारला जाईल. अर्जदारांनी या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी DRDO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here