शशिकांत शिंदे

आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋशीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमनेसामने भिडले असून दोन्ही गटात राडा सुरू आहे.

sakal_logo

द्वारे

महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : आज सकाळी 8 वाजता मेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीत प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांचे बंधू ऋशीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) आमनेसामने भिडले असून दोन्ही गटात राडा सुरू आहे. याची दखल घेत पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलंय.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) जावळी सोसायटी (Jawali Society) मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे व राष्ट्रवादीचेच जावलीतील उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्यात ही लढत होत आहे. या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलंय. आज सकाळपासूनच मेढा या मतदान केंद्रावर कमालीचे तणावपूर्ण वातावरण असून, दोन्ही गटांकडून विजयाचा दावा केला जात आहे. दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते मेढा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा: जिल्हा बॅंकेसाठी ‘हॉट’ बनलेल्या कऱ्हाडला मतदान प्रक्रियेस प्रारंभ

हाय होल्टेज ड्रामा ठरलेल्या या लढतीमुळे सातारा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला असून, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स आदी मिळून 100 हून अधिक पोलिस मतदान केंद्रावर उपस्थित आहेत. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून आमदार शिंदे व श्री. रांजणे या दोन्ही उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय.

हेही वाचा: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली ‘ऑफर’Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here