वडजी येथे वीजतारांमुळे जीव धोक्यात

वडजी येथे वीजतारांमुळे जीव धोक्यात ; दुरुस्तीबाबतच्या निवेदनाकडे महावितरणचे दुर्लक्ष

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

पाचोड : वडजी (ता.पैठण) येथील गावठाण हद्दीत होणाऱ्या गावातील खांबावरील महावितरणच्या विद्युत पुरवठ्याच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे घरासमोरील खांब बाजूला करण्याची निवेदनाद्वारे मागणी करून आठ महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप महावितरण विभागाने कोणतीच कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. परमेश्वर झिणे यांच्या घरापासून सार्वजनिक रस्त्यालगत अकरा के.व्ही च्या वीजपुरवठा करणाऱ्या जिवंत वीजतारा खाली लोंबकळत असून, त्यांचा अक्षरशः झोका झाला आहे.

म्हणून रस्त्याने ये-जा करणाऱ्यांसह परिसरातील नागरिकांना वीजतारांचा स्पर्श होऊन जीव जाण्याची भीती आहे. तरीही वीज महावितरण कंपनीकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे. १६ मार्च रोजी या खांबावरील तारा तुटून घरावर व सार्वजनिक रस्त्यात पडल्या. मात्र, भारनियमनामुळे वीजपुरवठा बंद असल्याने अनर्थ टळला होता.

हेही वाचा: अहमदनगर : डॉक्‍टर-परिचारिकांचा ‘आगीशी खेळ’

यावेळी शेकडो ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेत नागरिकांच्या घरालगत असलेले खांब काढून अन्य ठिकाणी उभे करण्यासंबंधी दावरवाडी येथील कनिष्ठ अभियंत्यास दिले होते. मात्र आठ महिने उलटले तरी अद्याप खांब बाजूला घेण्याची महावितरणने तसदी न घेतल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना व या भागातील रहिवाशांना वीज तारांमुळे धोका निर्माण झाला आहे.

आंदोलन करण्याचा इशारा -महावितरणने तातडीने घरावरून गेलेल्या तारा बाजूला घेण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच भाऊसाहेब गोजरे, परमेश्वर झिणे, उत्तम साबळे, शाहदेव भांड, गणेश लांडगे, आबासाहेब भांड, शाहदेव भांड, शिवाजी भांड, गणेश लांडगे, रामेश्वर लांडगे आदींनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here