डीसीसी बँक

दोषींवर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाईल, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी दिली.

sakal_logo

द्वारे

प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पिंपळनेर (ता. माढा) येथील शाखेत झालेल्या अपहाराला जबाबदार असलेल्या एकाही बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. दोषींवर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाईल, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी दिली.

हेही वाचा: सोलापूर : सुकन्या योजनेच्या गुंतवणुकीचा वाढतोय टक्का

या शाखेत अपहार झाल्याची माहिती मिळताच प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्यालयातील चार जणांचे पथक पिंपळनेर शाखेत पाठविले आहे. या शाखेत नेमक्‍या कशा पद्धतीने अपहार झाला आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल आज (रविवार) दुपारपर्यंत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या शाखेत अनेकांच्या खात्यावरील एक हजार रुपयांपासून तीन लाख रुपयांची रक्कम परस्पर काढण्यात आली आहे. ही रक्कम या शाखेतील बॅंक कर्मचाऱ्यांच्या नावावर असलेल्या सेव्हिंग खात्यात जमा करुन तेथून ही रक्कम काढल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: सोलापूर : सीना-भोगावती जोड कालव्यास लवकरच मंजुरी

कधी प्रिंटर खराब झाल्याचे तर कधी रेंज नसल्याचे कारण देत खातेदारांना या शाखेतून पासबुक प्रिंट करून दिले जात नसल्याचेही समोर आले आहे. पिंपळनेर शाखेतील अपहाराची माहिती प्रशासक कोथमिरे यांना शुक्रवारी (ता.19) रात्री मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आज तातडीने पिंपळनेर शाखेकडे मुख्यालयातील चार अधिकाऱ्यांचे पथक रवाना केले आहेत. हे अधिकाऱ्यांचे पथक बॅंकेतील कारभाराची सखोल चौकशी करत आहे. अपहार नेमका कशा पद्धतीने झाला?, किती रुपयांचा झाला?, त्यासाठी कोण कोण जबाबदार आहेत? याचा सविस्तर अहवाल आज (रविवारी) दुपारपर्यंत प्रशासक कोथमिरे यांना सादर केला जाणार आहे.

पिंपळनेर शाखेत ज्या-ज्या खातेदारांनी रक्कम ठेवली आहे त्या खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत. खातेदारांनी घाबरुन जाऊ नये. येथील अपहराचा अहवाल मिळताच ज्यांच्या खात्यावरुन परस्पर रक्कम वर्ग झाली आहे, त्या सर्वांची रक्कम सोमवारी (ता.22) व मंगळवारी (ता.23) खातेदारांच्या खात्यावर वर्ग केली जाईल.

शैलेश कोथमिरे, प्रशासक, डीसीसी बॅंक, सोलापूरEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here