
5 तासांपूर्वी
मुंबई : महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडू लागली आहे.पक्षातील अंतर्गत कलह तसेच पक्षाच्या नावावर निवडून येण्याची खात्री नसल्याने नगरसेवकच आगामी निवडणुकीसाठी सुरक्षीत छत्र शोधण्याच्या तयारीत आहे.पालिका निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता काही नगरसेवक पक्षांतर करण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले होते.विविध कारणांमुळे आता ही संख्या 29 वर आली आहे.2019च्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचे अवघे चार आमदार निवडून आले असून त्यातील तीन आमदार हे मुस्लिम आहेत.दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मतदार संघातील अमिन पटेल आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख हे मालाड पश्चिम या मुस्लिम बहुल भागातून निवडून आले आहेत.तर,वांद्रे पुर्व येथील झिशान सिध्दीकी हे शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे निवडून आले आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या धारावीतून निवडून आल्या आहेत.
हेही वाचा: मुंबई : पालिकेच्या दोन शाळा टॉप-१० मध्ये
विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास कॉंग्रेसचे मुंबईतील अस्तीत्व फक्त मुस्मिल मतदार संघात राहील्याचे चित्र दिसत आहे.तर,उत्तर भारतीय हा कॉंग्रेसचे पारंपारीक मतदार 2014 च्या लोकसभे पासून हा मतदारही भाजपकडे गेला आहे.त्यात,आगामी महानगर पालिका निवडणुकीतही फारसा पडण्याची शक्यता नाही.त्यातही पक्षातील अंतर्गत हेवेदाव्यांमुळे विजयाची फारसी खात्री विद्यमान नगरसेवकांना वाटत नाही.त्यामुळे या नगरसेवकांनी आता आगामी निवडणुकीसाठी सुरक्षीत पक्ष शोधण्याचा विचार सुरु केला आहे.29 नगरसेवकांपैकी किमान सात ते आठ नगरसेवक तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: हडपसर : वनरक्षकाला मारहाण करणाऱ्या सात-आठ जणांवर गुन्हा
– 227 प्रभागांपैकी 31 प्रभागात कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले होते.त्या पाठोपाठ अवघ्या 34 प्रभागात कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती.उर्वरीत सगळ्या प्रभागात कॉंग्रेसचा क्रमांक 3 पासून 6 व्या क्रमांकावर होता.या परीस्थीतीत आगामी निवडणुकीतही फारसा बदल होण्याची शाश्वती नगरसेवकांना वाटत नाही.
– पक्षाचे नेते शिवसेने बरोबर आघाडी करण्यास नकार देत आहे.त्यामागे जास्तीत जास्त जागा लढवून कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा त्यांचा विचार आहे.मात्र,त्यामुळे विजयाची शक्यता कमी होईल अशी भिती या नगरसेवकांना आहे.
2017 च्या पालिका निवडणुकीच्या वेळी राज्यात भाजप प्रणित सरकार मध्ये शिवसेनेचा समावेश होता.त्यामुळे भाजपने दुसरा क्रमांकाचा पक्ष असून विरोधी पक्षनेते पदावर दावा केला नव्हता.त्यामुळे हे पद तीसऱ्या क्रमाकांच्या कॉंग्रेसला मिळाले होते.मात्र,आता असे होण्याची शक्यता कमी असल्याने कॉंग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मिळणे मुश्किल आहे.
Esakal