Anandrao Patil

सातारा जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी कऱ्हाडात मतदान होत आहे.

sakal_logo

द्वारे

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Satara Bank Election) आज रविवारी कऱ्हाडात मतदान होत आहे. तेथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) मतदारांचा कौल आजमावत आहेत. दरम्यान, मतदानासाठी आज माजी आमदार आनंदराव पाटील (Former MLA Anandrao Patil) हे शिवाजी हायस्कूल (Shivaji High School) परिसरात आले होते. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झालीय, त्यामुळे त्यांना चालता येत नाही. त्यामुळे त्यांनी मतदान अधिकाऱ्यांना गाडीतच मतदान करून घेण्यासंदर्भात विनंती केली. त्यानुसार मतदान अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती तपासून त्यांचे गाडीतच मतदान करून घेतले.

कऱ्हाड सोसायटी गटात 100 टक्के मतदान

कऱ्हाड सोसायटी गटातील सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात उमेदवारी घेतलेल्या अॅड. पाटील-उंडाळकर यांनी आज रविवारी मतदानाच्या दिवशी दुपारनंतर येथील शिवाजी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोसायटी गटात दुपारी तीन वाजता 100 टक्के मतदान झाले.

हेही वाचा: आमदार शिंदे, मानकुमरे गट एकमेकांना भिडले

बाळासाहेब पाटील

बाळासाहेब पाटील

मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला आहे. दरम्यान, शिवाजी हायस्कूलमध्ये एकावेळी जास्त मतदार आले, तर होणारी गर्दी विचारात घेवून सहकार विभागाने तीन ठिकाणी मतदानाची व्यवस्था केली.

हेही वाचा: ‘फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान’

जिल्हा बँकेसाठी उमेदवार असलेल्या सहकारमंत्री पाटील व अॅड. उंडाळकर यांनी आज दुपारनंतर येथील शिवाजी हायस्कूलमध्ये मतदान केले. ही लढत प्रतिष्ठेची ठरल्याने राज्याचे लक्ष याकडे लागले आहे. दरम्यान, सोसायटी गटात दुपारी तीन वाजता 100 टक्के मतदान झाले.

हेही वाचा: जावळीत शरद पवार, अजित पवारांनी स्वतः घातलं लक्ष; आमदार शिंदेंची प्रतिष्ठा पणाला



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here