
5 तासांपूर्वी
आजरा : चोरीला गेलेल्या सात मोटारसायकली आजरा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यापैकी ६ मोटारसायकली आजरा, गडहिंग्लज परिसरातून चोरीला गेल्या होत्या. याची किमंत २ लाख २० हजार रुपये आहे. शशांक शिवाजी पाटील (वय २७ रा. सानेगुरुजी वसाहत, गंधर्वनगरी, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसातून मिळालेली माहीती अशी, गडहिंग्लज विभागात मोटारसायकलची चोरीचे प्रमाण वाढले होते. यासाठी आजरा पोलीस ठाण्यातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक नेमले होते. या अनुषंगाने आजरा- पेरणोली- देवकांडगाव मार्गावर पोलिसांची गस्त सुरु होती. यावेळी एक तरुण संशयास्पद फिरताना आढळला.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर तो कोल्हापूर येथील असल्याचे समजले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलीबाबत विचारणा केल्यावर ही मोटारसायकल आजरा येथील संभाजी चौकातून चोरल्याचे त्यांने कबूल केले. त्यानंतर मोटारसायकल चोरीचा प्रकार उघड झाला आहे. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक इचलकरंजी जयश्री गायकवाड, गडहिंग्लज उपविभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आजराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हारुगडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस नाईक अशोक शेळके, आनंदा नाईक, प्रशांत पाटील, चेतन घाडगे, संदिप मसवेकर, विशाल कांबळे, अनिल तराळ यांनी कारवाई केली.
Esakal