
पावसाळी वाहिनीत अडकलेल्या कुत्र्याची सुटका
5 तासांपूर्वी
कोथरूड – कोथरूडमधील महात्मा सोसायटी मधील पावसाळी वाहीनीत अडकलेल्या कुत्र्याची प्राणी मित्रांनी (ॲनिमल रेस्क्यू टीम) सुटका केली.
अन्नाच्या शोधात वा भितीने हे कुत्रे पावसाळी वाहीनीत शिरले असावे असा अंदाज प्रत्यक्ष दर्शींनी व्यक्त केला.
महात्मा सोसायटीचे अध्यक्ष महेश गोळे म्हणाले की, सकाळी फिरायला येणा-या नागरिकांना वाहीनीत कुत्रे अडकल्याचे लक्षात आले. श्री लोकपुरे यांनी लोकांना बोलावून सुटकेसाठी प्रयत्न केला. आम्ही महानगर पालिकेत व अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाने पाणी मारून या कुत्र्यांला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरवा. अखेर अॅनिमल रेस्क्यू दलाने डांबरी रस्ता व सिमेंट पाईप फोडून भटक्या कुत्याची सुटका केली. सकाळी 8 ते दुपारी 12-30 पर्यंत ही मोहीम सुरू होती.
Esakal