
‘कबूल, कबूल, कबूल’, मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?
२२ नोव्हेंबर २०२१
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप केला होता. त्यातच आता नवाब मालिकांनी नवीन फोटो समोर आणला आहे.
हेही वाचा: तोपर्यंत विश्वास नांगरे पाटलांना नोकरीतून मुक्त करा: किरीट सोमय्या
नवाब मलिक यांनी समोर आणलेला हा फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून समीर वानखेडे यांचा आहे. यामध्ये ते मुस्लीम वेशात दिसून येताय. कबूल, कबूल, कबूल असं म्हणत त्यांनी परदेशातून हा फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे आता वानखेडे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
Esakal