
5 तासांपूर्वी
हिंगोली : कोरोनामुळे पूर्णा – अकोला मार्गाने धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे बंद होत्या. आता त्या पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू झाल्या आहेत. रविवारी (ता.२१) परळी – अकोला पॅसेंजर नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावली.
अकोला – परळी पॅसेंजर हिंगोली स्थानकात सायंकाळी ५.२० ला आली. पुढे ती नवलगव्हाण, मालसेलू वाशीम मार्गे अकोल्याला गेली. परतीच्या प्रवासात ती सोमवारपासून (ता.२२) हिंगोली स्थानकावर दुपारी ४.४० ला येणार आहे. धामणी, नांदापूर, बोल्डा, वसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड मार्गे परळीत जाईल.
अकोला – पूर्णा
एक्स्प्रेस आजपासून
अकोला – पूर्णा मार्गाने सोमवारपासून (ता.२२) दररोज अकोला – पूर्णा एक्स्प्रेस धावणार आहे. ही रेल्वे हिंगोली स्थानकावर दररोज रात्री १२.५ ला येणार आहे. ती पुढे वसमत मार्गे पूर्णा येथे रात्री दोनला पोचेल. परतीच्या प्रवासात ती हिंगोली स्थानकावर बुधवारपासून दररोज रात्री दोनला येणार आहे. पुढे ती वाशीम मार्गे अकोला येथे पहाटे ३.४० ला पोचेल, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
पूर्णा – अकोला पॅसेंजरचे वेळापत्रक
पूर्णा – अकोला पॅसेंजर रेल्वे सोमवारपासून (ता.२२) नियमित धावणार आहे. ती येथील स्थानकावर दररोज सकाळी ८.३० ला येईल तर अकोला येथे दुपारी १२.३० ला पोचेल. परतीच्या प्रवासात हिंगोली स्थानकात ती सकाळी ८.२० ला येईल. पूर्णा येथे सकाळी १०.५० ला पोचणार असल्याचे स्टेशन मास्टर रामसिंग मीना यांनी सांगितले. या रेल्वेचा कंजार येथे थांबा देऊन नांदापूर येथील रेल्वेच्या वीज उपकेंद्राचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी गणेश साहू यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
Esakal