गेल्या 18 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात, कमजोर जागतिक संकेत आणि एफआयआयची (FII) विक्री यामुळे भारतीय बाजार जवळपास 2 टक्क्यांनी घसरले. यासह, मागील 2 आठवड्यांचा तेजीचा टप्पा देखील खंडित झाला. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,111.41 अंकांनी अर्थात 1.83 टक्क्यांनी घसरून 59,575.28 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 337.95 अंकांनी किंवा 1.86 टक्क्यांनी घसरून 17,764.8 वर बंद झाला.
धातू, ऊर्जा, रिॲलिटी, पीएसयू बँकेतील विक्रीमुळे निफ्टी 18,000 च्या खाली गेला, तर सेन्सेक्स 60,000 च्या खाली घसरला. मोठ्या शेअर्सप्रमाणेच स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्येही गेल्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. या काळात बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.7 टक्क्यांनी घसरला तर स्मॉलकॅप 1.5 टक्क्यांनी घसरला.

शेअर मार्केट
आता बाजाराची स्थिती कशी असेल?
निकालांचा हंगाम संपला असल्याने आता भारतीय बाजारांची नजर विदेशी घटकांवर असेल असे सॅमको सिक्युरिटीजच्या (Samco Securities) ईशा शाह म्हणाल्या. सेन्सेक्स-निफ्टी दबावाखाली राहण्याची अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या. येत्या आठवड्यात काही निवडक शेअर्सवर बाजाराची नजर असेल. जागतिक मॅक्रो डेटावर बाजाराची लक्ष ठेऊन असणार आहे. याशिवाय एफआयआयचाही बाजारावर परिणाम दिसून येईल. त्यामुळेच काही दर्जेदार शेअर्स घ्या असा सल्ला दिला जातो आहे.
निफ्टी गेल्या आठवड्यात सुमारे 2 टक्क्यांच्या घसरणीसह 17746 च्या पातळीवर बंद झाला आणि त्याने विकली. चार्टवर बियरिश कँडल निर्माण केली, जेबाजारातील कमजोरीचे लक्षण आहे. आता निफ्टीला पुढील सपोर्ट 17600 च्या झोनमध्ये दिसत आहे, असे एलकेपी सिक्युरिटीजचे (LKP Securities) रोहित सिंगरे म्हणाले.

शेअर मार्केट
निफ्टी या पातळीच्या वर राहिला तर चांगला पुलबॅक दिसू शकतो आणि निफ्टी पुन्हा एकदा 18000 च्या पातळीला स्पर्श करू शकतो, पण तसे झाले नाही तर निफ्टी आपल्याला आणखी घसरताना दिसेल. ज्यामुळे तो 17300 ची पातळी पाहू शकतो. -17000 देखील शक्य आहे. वरील साठी, 17830-17940 च्या झोनमध्ये एक अडथळा दिसतो, ही पातळी जवळ असताना नफा बुक करा असा सल्लाही त्यांनी दिला.

शेअर बाजार
आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?
– टाटा मोटर्स
– महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)
– टेक महिंद्रा (TECHM)
– HCLTECH
– L&T (LT)
– १ र (टाटापावर)
– अशोक लेलँड (ASHOKLEYLAND)
– NIIT तंत्रज्ञान (COFORGE)
– ग्लेनमार्क
– एमफॅसिस (MPHASIS)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Esakal