
पठाणकोटला पुन्हा निशाण्यावर? आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला
5 तासांपूर्वी
पंजाबमधील पठाणकोट येथील आर्मी कॅम्पजवळ सोमवारी सकाळी ग्रेनेडचा स्फोट झाला. धिरपुल येथील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर हा स्फोट झाला. एएनआय या वृत्तसंस्थेने संरक्षण विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार ही माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातून जात असताना बाईकवरून आलेल्या अज्ञात लोकांनी आर्मी स्टेशनच्या गेटजवळ ग्रेनेड फेकले.
Esakal