
रोहितला सामनावीर अन् मालिकावीराचाही किताब मिळाला, तरीही..
5 तासांपूर्वी
IND vs NZ, T20 Series : न्यूझीलंडच्या संघाला भारताने ३-०ने पराभूत करत मालिका विजय मिळवला. पूर्णवेळ टी२० कर्णधार झाल्यावर पहिल्याच मालिकेत रोहित शर्माला भरघोस यश मिळाले. भारताचा नवा टी२० कर्णधार रोहित शर्मा याला त्याच्या दमदार फलंदाजीसाठी मालिकावीराचा किताबही मिळाला. त्याने तीन सामन्यांच्या मालिकेत १५९ धाला केल्या. मालिकेनंतर या साऱ्या मुद्द्यांवर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. (Rohit Sharma Reaction)
हेही वाचा: IND vs NZ : हिटमॅन रोहितचा विश्वविक्रम; कोहलीला टाकले मागे
“मी जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा सुरूवात चांगली व्हावी यासाठीच मी खेळत असतो. संघाला धडाकेबाज सुरूवात मिळवून देणे हाच विचार फलंदाजी करताना माझ्या डोक्यात असतो. एकदा पिच आणि इतर गोष्टींचा अंदाज आला की फलंदाज म्हणून काय करायचं ते तुम्हाला माहिती असतं. मी खेळताना चेंडू चांगल्या वेगाने बॅटवर येत होता. त्यामुळे डावाला चांगली सुरूवात करून देणे हात माझा विचार होता. आमच्याकडे प्लॅन तयार होता. आम्ही दमदार खेळ करायला सुरूवात केली, पण मधल्या फळीतील खेळाडूंनी आम्हाला निराश केलं. अखेर खालच्या फळीतील खेळाडूंच्या फलंदाजीमुळे आम्हाला अपेक्षित धावा करता आल्या”, अशा शब्दात रोहित शर्माने आपली नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा: एकेकाळी होता विराटचा लाडका; रोहित आल्यावर करियर झालं उद्ध्वस्त
“हा मालिका विजय नक्कीच खास आहे. संपूर्ण मालिकेत आम्ही चांगली कामगिरी केली. माझ्या पहिल्याच मालिकेत इतकं यश मिळालं ही गोष्ट चांगली आहे, पण तरीही आम्हाला आमचे पाय जमिनीवर ठेवावे लागतील. वर्ल्डकपनंतर अवघ्या दोन दिवसात भारतात येणं आणि पुढील सहा दिवसात तीन सामने खेळणं ही बाब न्यूझीलंडसाठी सोपी नव्हती. त्यामुळे या मालिकाविजयाची हवा डोक्यात जाऊ न देता आपण पुढे नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत”, असा मोलाचा सल्ला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने दिला.
Esakal