Syed Mushtaq Ali Trophy : शाहरुखच्या सिक्सरनं तामिळनाडूला विक्रमी जेतेपद

Syed Mushtaq Ali Trophy : शाहरुखच्या सिक्सरनं तामिळनाडूला विक्रमी जेतेपद

sakal_logo

द्वारे

सुशांत जाधव

Syed Mushtaq Ali Trophy : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये तामिळनाडूने विक्रमी जेतेपद पटकावले. धावांचा पाठलाग करताना अटतटिच्या लढतीत त्यांनी 4 गडी राखून कर्नाटकला पराभूत केले. अखेरच्या चेंडूवर तामिळनाडूला 5 चेंडूची आवश्यकता होती. शाहरुख खानने षटकार खेचत संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. तामिळनाडूचे हे आतापर्यंतचे तिसरे जेतेपद आहे. या विजयासह तामिळनाडू सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिकवेळा जेतेपद मिळवणारा संघ ठरलाय. कर्नाटकने यापूर्वी मनिष पांड्येच्या नेतृत्वाखाली दोन वेळा स्पर्धा जिंकली होती. त्यांनी विक्रमी तिसऱ्यांदा चषक उंचावण्याची संधी गमावली आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकने निर्धारित 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या. खराब सुरुवातीनंतर अभिनव मनोहरने 37 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 46 धावांची आश्वासक खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूच्या जगदिशनने 41 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात शाहरुख खानने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हातून निसटलेला सामना तामिळनाडूनं आपल्या नावे केला. शाहरुखने 15 चेंडून 33 धावांची नाबाद आणि मॅच विनिंग खेळी केली.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here