आरोपींना अटक
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी (Rabale Police) ऐरोली सेक्टर-२० मधील शिवशंकर हाईट्स या इमारतीत २९ व्या मजल्यावर बेकायदा सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर (fake call center) छापा मारला. या वेळी सात जणांना अटक (seven culprit arrested) करण्यात आली. या टोळीने ॲमेझॉन कस्टमर सर्व्हिसच्या (Amazon customer service) नावाने अमेरिकेतील नागरिकांना (American people) इंटरनेट कॉलद्वारे संपर्क साधला. या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भीती दाखवली. त्यांच्याकडून डॉलर स्वरूपात मोठी रक्कम (money fraud) उकळल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणात NCBचं थोबाड फुटलंय!

या टोळीने कॉल सेंटरच्या माध्यमातून हजारो अमेरिकन नागरिकांना लुबाडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार या टोळीची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या कारवाईत कॉल सेंटर चालविण्यासाठी लागणारे १० लॅपटॉप, दोन राऊटर, आठ मोबाईल फोन आणि ४ हेडफोन असे साहित्य जप्त करण्यात आले.

ऐरोली सेक्टर-२० मधील शिवशंकर हाईट्स इमारतीतील २९ व्या मजल्यावर काही व्यक्तींकडून बनावट कॉल सेंटर चालविण्यात येत असल्याचे तसेच सदर कॉल सेंटरमधून ॲमेझॉन कस्टमर सर्व्हिसच्या नावाने अमेरिकन नागरिकांना व्हिओआयपी कॉल व ई-मेलद्वारे संपर्क साधून त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास पोलिस निरीक्षक अजय भोसले, पोलिस उपनिरीक्षक नागेश शिरसकर, प्रकाश बोडरे व त्यांच्या पथकाने सदर कॉल सेंटरवर छापा टाकला.

हेही वाचा: ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास धोकादायक; देहविक्रीसाठी तृतीयपंथीयांचे अड्डे

त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर टोळीतील सदस्य तेथील कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी कॉल व ई-मेलद्वारे संपर्क साधून त्यांच्या संगणकात इतर व्हायरस वा मालवेअर व्हायरस घुसल्याचे भासवून त्यांचे ॲमेझॉन अकाऊंट हॅक झाल्याची त्यांना भीती दाखवत असल्याचे आढळून आले. तसेच त्यांना अँटी वायरस अथवा सेक्युरिटी सर्व्हीस घेण्यासाठी भाग पाडून त्यांच्याकडून गिफ्ट कार्डद्वारे अमेरिकन डॉलरच्या माध्यमातून पैसे स्वीकारत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी संगणक आणि सायबर तज्ज्ञ पुष्कर यांच्या माध्यमातून सर्व लॅपटॉपची तपासणी करून त्यातील सर्व डेटा ताब्यात घेऊन १० लॅपटॉप, २ राऊटर, ८ मोबाईल फोन व ४ हेडफोन असे साहित्य जफ्त केले.

त्यानंतर पोलिसांनी सदर कॉल सेंटर चालविणारे मेहताब आयुब सय्यद (२७), नौशाद रजी अहमद शेख (२४), हुसेन शब्बीद कोठारी (३५), सौरभ सुरेश दुबे (२६), सुरज मोहन सिंग (२५), आसिफ हमीद शेख (२३) आणि धर्मेश राकेश सालीयन (३२) या सात जणांना अटक केली. या टोळीने ॲमेझॉन कंपनीकडे असलेल्या अमेरिकेतील नागरिकांचा डाटा मिळवून हजारो अमेरिकन नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात डॉलर स्वरूपात रक्कम लुबाडली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या टोळीची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

फसवणूक करण्याची पद्धत

या टोळीकडून अमेरिकन नागरिकांना अमेझॉनच्या नावाने मेसेज अथवा कॉल केले जाते. त्यानंतर अमेरिकन नागरिकांनी या टोळीने दिलेल्या नंबरवर कॉल केल्यास सदरचे कॉल ते इंटरनेटच्या माध्यमातून कॉल सेंटरमधील लॅपटॉपवर वळवून घेतले जाते. त्यानंतर या टोळीतील सदस्यांकडून अमेरिकन नागरिकांना त्यांचे अमेझॉन अकाऊंट हॅक झाल्याचे अथवा त्यांच्या अकाऊंटद्वारे परस्पर खरेदी होत असल्याचे सांगून त्यांना भीती घातली जाते. त्यानंतर त्यांचे अकाऊंट हॅक होऊ नये वा त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना अँटी व्हायरस अथवा सिक्युरिटी सिस्टीम घेण्यास प्रवृत्त केले जाते. सदर अँटी व्हायरस-सिक्युरिटी सिस्टीमच्या किमतीचे विविध रकमेचे गिफ्ट कार्ड त्यांना खरेदी करण्यास भाग पाडले जाऊन त्यांच्याकडून ॲक्टीवेशन कोड मिळविले जात असल्याचे व त्यानंतर ॲक्टीवेशन कोड वापरून अमेरिकन डॉलरची रक्कम हवाला मार्फत भारतीय चलनात स्वीकारली जात असल्याचे तपासात आढळून आले.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here