बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले
sakal_logo

द्वारे

– मिलिंद संगई

बारामती : येथील बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी (ता. 22) 15 जागांसाठी 235 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली.

सर्वसाधारण प्रभागासाठी 158 अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीव प्रवर्गासाठी 16, इतर मागासवर्ग प्रवर्ग- 25, अनुसूचित जाती जमाती- 17 तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठी 26 अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी (ता. 23) उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. बुधवारी (ता. 24) वैध अर्ज असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 8 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार असून आवश्यकता भासल्यास 19 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

अनेक विद्यमान संचालकांनीही पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल केले असून आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. नॉनशेड्यूल्ड क्षेत्रातील पुणे विभागातील सर्वात मोठी बँक म्हणून नावलौकीक असलेल्या या बँकेच्या सहा जिल्ह्यात 36 शाखा असून 2260 कोटींच्या ठेवी तर 1525 कोटींचे कर्ज वाटप आहे. बँकेचे तब्बल 16456 सभासद आहेत.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here