अटक
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याचा सोयाबीन भरलेला पिकअप लुटणारे चोरटे अटक करुन २२ क्विंटल सोयाबीन येथील शहर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलिस पथकाने दिपक ऊर्फ डॅनी दिलीप बारसे (वय ३३), मनोज लक्ष्मण सोडणार (वय २२, रा. दोघेंही रा. नांदुर ता. श्रीरामपुर) यांना नुकतीच अटक केली. असुन त्यांचे फरार साथीदार गणेश शंताराम जाधव (रा. नांदुर, ता. राहाता), संदिप पारखे (रा. ममदापुर, ता. राहाता), विवेक लक्ष्मण शिंदे (वय २५, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपुर) यांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी आरोपी बारसे व सोडणार यांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. असता पुढील दोन दिवस आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मागील काही दिवसापुर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी विनोंद डिगांबर साबळे (वय ३६, रा. डोगर शेवली ता. चिखली) हे पिकअप भरुन सोयाबीन विक्रीसाठी श्रीरामपुर कृषी उत्पन बाजार समितीत येत होते. त्यावेळी वरील आरोपींनी दुचाकीवर येवुन टिळकनगर चौकी पासुन ते टाकळीभान परिसरातील रुक्मीणी मंगल कार्यालय समोरील पुला पर्यंत साबळे यांच्या पिकअपचा पाठलाग केला. त्यातील पाहिल्या दुचाकीस्वाराने साबळे यांची बळजबरीने अडवणुक करुन सोयाबीन भरलेली पिकअप नेवासाच्या दिशेने पळविला. तर दुसऱ्या दुचाकीस्वाराने साबळे यांच्याकडील साडेतीन हजर रुपये बळजबरीने हिस्कावुन घेतले. त्यानंतर साबळे यांना नेवासे रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळील शेती महामंडाळाच्या जागेत एकाच ठिकाणी बसवुन ठेवले.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

काही वेळाने पिकअप मधील ३० क्विटंल सोयाबीन काढुन घेत साबळे व त्यांच्या मित्राला पिकअप जवळ सोडल्याचा प्रकार मागील आठवड्यात घडला होता. याप्रकरणी विनोंद डिगांबर साबळे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुप्त माहितीनुसार आरोपींचा कसुन शोध घेत, दोघा आरोपींना तातडीने ताब्यात घेतले. त्यांची कसुन चौकशी केल्यानंतर आरोपींनी सोयाबीन चोरी केल्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी चोरट्यांकडुन सव्वा लाख रुपये किमतीचे २२ क्विटंल जप्त केला. असून फरार दोन आरोपींचा सर्वत्र शोध सुरु आहे. तर विवेक शिंदे (वय २५, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपुर) याला तालुका पोलिसांनी आणखी एका सोयाबीन चोरीप्रकरणी अटक केली. असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here