
6 तासांपूर्वी
मुंबई : कोरेानामुळे (corona) राज्यात मागील दोन वर्षात तब्बल २५ हजार ६८१ मुले ही अनाथ (orphan student) झाली आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क (education fees) आणि सध्या सुरू असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेचे परीक्षा शुल्क (ssc and hsc exam fees) माफ करावा. त्यासाठी स्पष्ट आदेश काढावेत अशी मागणी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकुर्णी (heramb Kulkarni) यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना एक पत्र लिहून केली आहे.
हेही वाचा: पोलीस दल कोणत्याही जमिनदारीचा भाग नाही; CBI चा सरकारवर आरोप
राज्यात सध्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात कोरोनात महाराष्ट्रात मृत्यू झालेल्या कुटुंबाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. दवाखान्याच्या खर्चाने अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली व असंघटित क्षेत्रातील गरीब कुटुंबांची ही संख्या लक्षणीय आहे. यासाठी किमान या कुटुंबातील विद्यार्थ्यांची दहावी-बारावीच्या परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ करावी अशी विनंती कुलकुर्णी यांनी केली आहे.
शिक्षण विभागाने कोरोनात पालक गमावलेल्या पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली असून ती संख्या सरकारकडे आहे. या विद्यार्थ्यांची सरकारने फी त्वरित माफ करावी. त्याच बरोबर पहिली ते वी आठवीपर्यंतच शालेय पोषण आहार, गणवेश व मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात ती देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
हेही वाचा: RTI : कोविड फंडातून केवळ 25 टक्के रक्कमेचे वाटप; वाचा सविस्तर माहिती
शालेय खर्चासाठी प्रोत्साहनपर रक्कम द्या
राज्यात शिक्षण घेत असलेल्या नववी ते बारावीला या योजनांचा लाभ मिळत नसल्याने नववी ते बारावीपर्यंत शिक्षणाचा खर्च खूप वाढतो. हा खर्च करणे विधवा महिलांना खूप कठीण होते आहे. महाग पाठ्यपुस्तके स्वतः खरेदी करावी लागतात. अशा विधवा महिलांच्या मुलांना शालेय इतर खर्चासाठी विशिष्ट रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्याची आवश्यकता आहे. त्यातून हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
वेगळ्या शिष्यवृत्तीची आवश्यकता
मागील वर्षांत अनाथ झालेली असंख्य मुले ही कठीण आर्थिक स्थितीमुळे बालमजुरीकडे वळली आहेत व अनेक मुली बालविवाहाला बळी पडल्या आहेत. त्यामुळे नववी ते बारावीच्या इयत्तेतील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवाहात टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज वाटते. सर्वच एकल व विधवा महिलांच्या मुलांसाठी शासनाने असा दृष्टिकोन घ्यायला हवा व शुल्क माफी व प्रोत्साहनपर मदत आणि पालक गमावेलेल्या मुलांसाठी वेगळी शिष्यवृत्ती जाहीर करावी अशी मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे.
Esakal