Prabhakar Gharge

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोरे यांची उमेदवारी अंतिम केल्याने राष्ट्रवादीची प्रमुख नेतेमंडळी झाडून कामाला लागली होती.

sakal_logo

द्वारे

अयाज मुल्ला

वडूज : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खटाव सोसायटी मतदार संघातून माजी आमदार व अपक्ष उमेदवार प्रभाकर घार्गे यांचा दहा मतांनी विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी सहकार पॅनेलचे उमेदवार नंदकुमार मोरे यांना 46 मते मिळाली. विजयानंतर घार्गे समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी खटाव सोसायटी मतदार संघातून उमेदवारीसाठी माजी आमदार श्री. घार्गे व जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार मोरे यांच्यातील उमेदवारी बाबत गेल्या काही दिवसांत चर्चा सुरु होती. श्री. घार्गे हे एका खटल्यात न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीतील एका गटाने मोरे यांचे समर्थन करीत घार्गे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी केली होती. श्री. घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे यांनीही सोसायटी मतदार संघ व महिला राखीवमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. श्री. घार्गे यांच्या उमेदवारीबाबत पक्षातूनच शह- काटशहाचे राजकारण सुरू होते. त्यामुळे अखेरीस श्री. घार्गे यांनीच सोसायटी मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार घार्गे समर्थकांनी केला.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोरे यांची उमेदवारी अंतिम केल्याने तालुक्यातील राष्ट्रवादीची प्रमुख नेतेमंडळी झाडून कामाला लागली होती. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, सुरेंद्र गुदगे, प्रा. बंडा गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे, प्रा. अर्जुनराव खाडे आदी प्रमुख मोरे यांच्या पाठीशी होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दिपक चव्हाण यांनी मोरे यांच्या समर्थनार्थ येथे प्रचार सभा घेतली होती. श्री. घार्गे कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये असतानाही माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती माजी मानसिंगराव माळवे तसेच सौ. इंदिरा घार्गे, कन्या प्रिती घार्गे, प्रिया घार्गे तसेच काही समर्थक कार्यकर्त्यांनी श्री. घार्गे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.

हेही वाचा: भाजपच्या साथीनं NCP सहकारमंत्र्यांकडून ‘काँग्रेस’चा करेक्ट कार्यक्रमEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here