
माण व कोरेगाव सोसायटी मतदार संघातून दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवाराची घोषणा होणार आहे.
5 तासांपूर्वी
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) माण व कोरेगाव सोसायटी मतदार संघातून दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवाराची घोषणा होणार आहे. या निवडणुकीत कोरेगाव सोसायटी (Koregaon Society) मतदार संघातून सहकार पॅनेलचे शिवाजीराव महाडिक (Shivajirao Mahadik) यांना 45 मते मिळाली. तसेच अपक्ष उमेदवार सुनील खत्री यांनाही 45 मते मिळाली आहेत. माण मतदारसंघातून सहकार पॅनलचे मनोज पोळ यांना 36 मते मिळाली. तसेच अपक्ष उमेदवार शेखर गोरे (Shekhar Gore) यांना 36 मते मिळाली आहेत. त्यामुळे याही मतदारसंघातील विजयी उमेदवाराची घोषणा चिठ्ठीद्वारे होणार आहे.
हेही वाचा: भाजपच्या साथीनं NCP सहकारमंत्र्यांकडून ‘काँग्रेस’चा करेक्ट कार्यक्रम
Esakal