Kranti Redkar,Navab Malik
sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे यांचा नवीन फोटो समोर आणला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक नवीन ट्विट करून ‘अरे माझ्या देवा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर (kranti Redkar) यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

मलिकांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ”कोणीतरी एक व्यक्ती त्यांना मलिकांविरोधातील पुरावे असल्याचे सांगतात. क्रांती रेडकर कुठला पुरावा आहे, असं विचारतात. मलिकांचा दाऊदसोबत फोटो असल्याचं ती व्यक्ती सांगतेय. त्यानंतर मलिकांविरोधात पुरावा दिला तर मी बक्षीस देईल, असं क्रांती रेडकर रिप्लाय देतात.” हे स्क्रीनशॉट शेअर करताना मलिकांना ओ माय गॉड, असं कॅप्शन दिलं असून आज सकाळीच मला हे मिळाल्याचं ते सांगतात. पण, मी कोणासोबतही चॅट केली नसून मलिकांनी हे एडीट केलं आहे, असा आरोप क्रांती रेडकर यांनी केला आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here