गडचिरोली : वाघाने केले महिलेला ठार
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जवळपास दोन ते अडीच महिने वाघाच्या हल्ल्यापासून मुक्त असलेल्या पोर्ला वनपरीक्षेत्रातील चुरचुरा (माल) येथे वाघाने मंगळवार (२३) दुपारी १२. १५ वाजताच्या दरम्यान एका महिलेवर हल्ला करत तिला ठार केले. इंदिरा उद्धव आत्राम (वय ६०) रा. चुरचुरा (माल), असे मृत महिलेचे नाव आहे.

मृत इंदिरा आत्राम गावातील आठ महिलांसोबत मंगळवारी सकाळी केरसुणीसाठी गवत तोडायला आल्या होत्या. दरम्यान त्यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. सोबतच्या महिला ओरडायला लागल्या. त्यामुळे वाघ पळून गेला.

हेही वाचा: ‘शेतकरी विकास’चा | धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेवर झेंडा

गंभीर जखमी असलेल्या इंदिरा आत्राम यांना महिलांनी जंगलातून बाहेर काढून गावात आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मृत्यू झाला. इंदिरा आत्राम व त्यांचे पती उद्धव आत्राम हे दोघेच गावात राहत होते. यापूर्वी २५ डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत या परिसरात वाघाने ११ नागरिकांना ठार केले आहे. मध्यंतरी १४ सप्टेंबर २०२१ रोजी रानात अळींबी गोळा करायला गेलेल्या देलोडा येथील भिमदेव नागापुरे या व्यक्तीला वाघाने ठार केले होते. त्यानंतर या परिसरात एकही घटना घडली नव्हती. पण, आता पुन्हा वाघाने या महिलेला ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here