
5 तासांपूर्वी
वाघोली : वाघोलीत पी एम आर डी ए चे अग्निशमन केंद्र सुरू होऊन एक वर्ष झाले. वर्षभरात जिल्ह्यातील व काही शहरातील अशा 80 आगीच्या घटनांवर या केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी नियंत्रण मिळविले. तर 20 घटनेत बचावकार्य केले.
केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर 9 नोव्हेबंर रोजी येथे कर्मचारी दाखल झाले. या केंद्राला 11 नोव्हेबंर रोजी लोणीकंद येथील बचावकार्याचा पहिला कॉल मिळाला. तर 11 नोव्हेबंर रोजी शिक्रापूर येथील आगीच्या घटनेचा पहिला कॉल मिळाला. या केंद्रात वेगवेगळ्या क्षमतेच्या तीन अग्निशमन गाड्या आहेत. तर एक बुलेट व एक रुग्णवाहिका आहे. 19 कर्मचारी येथे काम करतात. पाण्यासाठी दोन 50 हजार लिटरच्या टाक्या आहेत.तर एक विहीर आहे. जिल्ह्यातील आगीच्या घटनेबरोबरच शहरातील मोठ्या आगीच्या घटनेप्रसंगीही त्यांना जावे लागते.
वाघोलीतील सिसका गोदमातील आग, सिरम इन्स्टिट्यूटची आग, फुरसुंगी येथील आगीची घटना अशा अनेक मोठ्या घटनेतही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. यामध्ये कर्मचारी जखमी झाल्याचा प्रकारही घडला.वाघोलीत केंद्र सुरू होण्यापूर्वी नांदेड फाटा येथील केंद्रातून अग्निशमन गाडी येत होती. जिल्ह्यात आगीची घटना घडल्यानंतर या केंद्रातून गाडी घटना स्थळी पोहचण्यासाठी दोन ते तीन तासाचा कालावधी लागत होता. वाघोलीतील केंद्र सुरू झाल्यानंतर नगर, सोलापूर व नाशिक महामार्गावरील घटनेच्या ठिकाणी वाघोलीतील गाडी तात्काळ पोहचते. यामुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळविले जाते. बचाव कार्यामध्येही वेळेत मदत मिळते. पाण्यातील मृतदेह शोधणे, अडकलेल्यांची सुटका करणे अशी बचावाची अनेक कामे कर्मचाऱ्यांना करावी लागतात. आणीबाणीच्या आगीच्या परिस्थितीत नियंत्रण कसे मिळवायचे याचे प्रशिक्षणही या केंद्राकडून नागरिकांना दिले जाते. केंद्राने अनेक ठिकाणी प्रशिक्षणही दिले आहे.
हेही वाचा: फरार…! परमबीर सिंगाच्या घरावरचा आदेश वाचला का?
उदघाटनाविनाच केंद्राला वर्ष पूर्ण
मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घघाटन करण्याचे नियोजन होते. मात्र त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वेळे अभावी रखडले. त्यानंतर कोरीना स्थिती निर्माण झाली.यामुळे या केंद्राचे उदघाटन अद्याप रखडले आहे. काम मात्र जोमाने सुरू आहे.
नागरिकांनी प्रशिक्षण घ्यावे
आगीच्या आणी बाणीचा प्रसंग कधीही उद्भभवतो. मात्र अशा वेळी काय करायचे याचे प्रशिक्षण नसल्याने नागरिकांना परिस्थिती हाताळता येत नाही. मात्र याचे प्रशिक्षण घेतल्यास खूपच फायदा होईल. सोसायटीतील नागरिक, रुग्णालय कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला यांनी केंद्रात ग्रुपने येऊन प्रशिक्षण घ्यावे. मोठ्या सोसायटी मध्ये कर्मचारी येऊनही प्रशिक्षण देतात. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन वाघोली केंद्राचे उपस्थानक अधिकारी विजय महाजन यांनी केले आहे.
अग्निशमन केंद्राचा संपर्क क्रमांक
०२०२९५१८१०१
02029519101
Esakal