
Parbhani : रस्त्यासाठी तहसील कार्यालयात ‘ठेचा भाकर’ आंदोलन
5 तासांपूर्वी
पाथरी (जि.परभणी) : सारोळा बुद्रूक (ता.पाथरी) (Pathari) येथील गावकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठेचा भाकर खाऊन आज मंगळवारी (ता.२३) आंदोलन केले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सारोळा-टाकळगव्हाण रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने अनुसया कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात सदरील आंदोलन करण्यात आले आहे. सारोळा-टाकळगव्हाण रस्त्याच्या कामाचे कंत्राट बीड (Beed) जिल्ह्यातील परळी येथील अनुसया कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेले (Parbhani) आहे.
हेही वाचा: राज्य सरकार केंद्राला चालवायला द्या : खासदार प्रितम मुंडे
कंपनीने वेळेत या रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी ठेचा भाकर आंदोलन केले. आगामी डिसेंबर महिन्यात सदरील रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन कंपनीने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
Esakal