समीर वानखेडे
sakal_logo

द्वारे

दीनानाथ परब

मुंबई: हाय-प्रोफाईल कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Drugs case) एनसीबी (Ncb) आणि समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. चुकीच्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी केल्याचा आरोप झाला. आता एका पोलीस अधिकाऱ्यानेही असेच आरोप केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला खोट्या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने माझ्या मुलाला अटक केली असा दावा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने केला आहे.

माजी पोलीस अधिकारी अनंत किंजले यांनी या प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखलं केलं आहे. त्यांचा मुलगा श्रेयसला अटक झाली होती. माझ्या अटकेच्यावेळी समीर वानखेडे तिथे उपस्थित होते. पण तिथे जे घडलं, ते सर्व पंचनाम्यात नमूद केलेलं नाही, असं आरोपी श्रेयस किंजलेने कोर्टात म्हटलं आहे. इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डवर घ्यावे, जेणेकरुन त्याच्या दाव्याची पडताळणी करता येईल, अशी श्रेयस किंजलने कोर्टात केलेल्या अर्जात विनंती केली आहे.

हेही वाचा: व्हिडीओसाठी तिथे पोझ देणं पडलं महाग; २२ वर्षांच्या मुलाचं दुर्देव

२२ जूनच्या संध्याकाळी आठच्या सुमारास NCB ने श्रेयसला अटक केली होती. अटक झाली, त्या रात्री ९.४७ च्या सुमारास समीर वानखेडे मेनगेटमधून आत आले. त्यांच्यासोबत व्हीव्ही सिंह हे अधिकारी होते. पण पंचनाम्यामध्ये समीर वानखेडेंच्या उपस्थितीचा उल्लेख नाहीय, असे आरोपीने अर्जात म्हटले आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here