
मोरया गोसावी मंदिरात
अंगारकी चतुर्थीनिमित्त गर्दी
5 तासांपूर्वी
पिंपरी, ता. २३ : अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (ता. २३) चिंचवडगावातील श्रीमन महासाधू मोरया गोसावी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चेहऱ्याला मास्क परिधान करण्यासह सोशल डिस्टसिंग पाळण्याबाबत आवाहन केले जात होते.
अंगारकीसह संकष्टी चतुर्थीलाही येथे दर्शनासाठी गर्दी होत असते. दूर अंतरावरून भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, कोरोनामुळे अनेक दिवस मंदिर बंद होते. काही भाविक बाहेरूनच दर्शन घायचे. दरम्यान, मंदिरे खुली झाल्यानंतर ही पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांमध्येही उत्साह होता. सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरातील प्रसाद, हार-फुले, खेळणीची दुकानेही गजबजली होती. सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. कोरोनाचे नियम पाळून भाविकांनी दर्शन घेतले.
Esakal