
5 तासांपूर्वी
नागपूर : इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर मुलीचे युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. आई-वडील झोपी गेल्यानंतर मुलगी प्रियकराला घरी बोलवायला लागली. मध्यरात्रीनंतर अचानक आई लघुशंकेला जात असताना मुलीच्या बेडरूममध्ये डोकावून बघितले. अल्पवयीन मुलगी युवकासोबत नको त्या अवस्थेत बेडवर आढळली. त्यामुळे आईने प्रियकराची चांगली धुलाई केली आणि पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सूरज ब्रह्मानंद लहाने (वय २७, बंगाली पंजा, लेंडी तलाव) असे आरोपी युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपावली परिसरात ३८ वर्षीय महिला परिचारिका पती व १७ वर्षीय मुलीसह राहते. मुलगी रिया (बदललेले नाव) ही अकराव्या वर्गात शिकते. अभ्यासात हुशार असल्यामुळे आई-वडिलांनी तिला महागडी फी भरून ट्युशन क्लास लावून दिले. ऑनलाइन क्लास होत असल्यामुळे तिला महागडा मोबाईल घेऊन दिला.
हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?
ऑनलाइन क्लास करतानाच तिने इंस्टाग्रामवर अकाऊंट उघडले आणि वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ टाकयला लागली. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच आरोपी सूरज लहाणे याच्याशी ओळख झाली. सूरज हा फर्निचरचा कारागीर असून ऑर्डरनुसार घरोघरी काम करतो. त्याने रियाला इंस्टावर रिक्वेस्ट पाठविली. दोघांचे एकमेकांना रोज मॅसेज सुरू झाले. त्याने रियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यामुळे ती ऑनलाइन क्लास सोडून सूरजशी चॅटिंग करायला लागली.
तीन महिन्यांतच रियाचा त्याच्यावर विश्वास बसला आणि तिने त्याला फुटाळ्यावर भेटायला बोलावले. सूरज तेथे गेला आणि रियाची भेट घेत तिला हॉटेलमध्ये नेऊन प्रेमाची मागणी घातली. त्यामुळे तिचा आणखी विश्वास बसला. त्यानंतर दोघांच्या वारंवार भेटी व्हायला लागल्या. आरोपी सूरजने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यामुळे तिने थेट मध्यरात्री साडेबारा वाजता घरी येण्यास सांगितले. सोमवारी रात्री साडेबारा वाजता रियाने सूरजला कॉल केला. त्यावेळी तिचे आई-वडील शेजारच्या बेडरूममध्ये झोपले होते. सूरज घरी येताच त्याने मिसकॉल केला आणि रियाने हळूच दार उघडले आणि त्याला आत घेतले.
हेही वाचा: सेक्समुळे स्पेनचा समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट
आईला आला संशय
सोमवारी रात्री एक वाजता रियाची आई लघुशंकेला गेली. त्यावेळी तिला मुलीच्या बेडरूममधून आवाज येत असल्याचे लक्षात आले. तिने काळजीपोटी मुलीच्या बेडरूमचा दरवाजा उघडला आणि लाईट लावला. त्यावेळी मुलगी नको त्या अवस्थेत युवकासोबत दिसून आली. त्यामुळे आईला धक्काच बसला. तिने सूरजच्या कानशिलात वाजवली आणि पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरजला अटक केली.
Esakal