
5 तासांपूर्वी
मुंबई : रिक्षाचं 150 रुपये भाडं झालं, सुट्टे 150 रुपये मागणाऱ्या रिक्षा चालकाचा प्रवाशांनी चाकुचे वार करत खुन केल्याची घटना वाडाळा ट्रक टर्मिनस भागात घडलीये. फारुख अन्सारी असं खुन झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, तो 38 वर्षांचा होता.
हेही वाचा: शेतकऱ्यांनो, नाव नोंदवा अन् दरवर्षी मिळवा 6000 रुपये!
आज पहाटे 4 वाजता गोवंडीतून तीन प्रवाशांना घेऊन तो वडाळा टीटी भागात आला होता, मिटरनुसार रिक्षाचं 150 रुपये बील झालं होतं. फारुख अन्सारीनं बीलाचे पैसे सुट्टे देण्याची मागणी केली, मात्र आरोपींकडे पैसे सुट्टे नसल्यानं त्यांच्यात बाचाबाची झाली, आणि प्रवाशांनी रागाच्या भरात फारुख अन्सारीवर चाकुचे वार करत त्याचा खुन केला. तीनही आरोपींना वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी अटक केलीये. आरोपींचं वय 20 वर्षाच्या जवळपास आहे.
Esakal