सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी बाजाराच्या घसरणीला काहीसा ब्रेक लागला. दोन्ही सेन्सेक्स निफ्टी हिरव्या मार्कवर अर्थात तेजीसह बंद झाले. निफ्टी अर्धा टक्का वाढला आणि 17,500 च्या वर बंद झाला. बँक निफ्टीही किरकोळ वाढला आणि 144 अंकांनी वाढला. याशिवाय, लेटेंट व्ह्यूची मजबूत लिस्टिंग ही बाजारातली महत्त्वाची घटना ठरली. सेन्सेक्स 198 अंकांनी वाढून 58,664 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 87 अंकांनी वाढून 17,503 वर बंद झाला. निफ्टी बँक 144 अंकांनी वाढून 37,273 वर बंद झाला. तर मिडकॅप 534 अंकांनी वाढून 30,865 वर बंद झाला.

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीला पहिला सपोर्ट 17,200 वर तर रझिस्टंस 17,600 वर दिसत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. जर निफ्टीने 17,600 ची पातळी ओलांडली तर तो 17,800 आणि 17,900 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, बँक निफ्टीला 36,300 वर सपोर्ट आहे. 38,000 वर वरच्या बाजूला एक रझिस्टंस असल्याचे पलक कोठारी म्हणाले.

हेही वाचा: कमाईची मोठी संधी! लवकरच ‘या’ 6 कंपन्यांचे IPO येणार

शेअर बाजार

शेअर बाजार

निफ्टीने डेली स्केलवर बुलिश कँडल तयार केली आहे आणि गेल्या ५ ट्रेडिंग सत्रांपासून ते लोअर हाय – लोअर लोची आकृती दिसत असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. आता जर निफ्टीला 17,650 आणि 17,777 च्या जवळ जायचे असेल तर 17,500 च्या वर रहावे लागेल. खाली, 17,350 आणि 17,200 च्या पातळीवर त्याला सपोर्ट असल्याचेही ते म्हणाले.

17,400 ची पातळी डे ट्रेडर्ससाठी खूप महत्त्वाची पातळी असेल असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. जर निफ्टी याच्या वर राहिला, तर 17,600-17,650 पर्यंत पुल बॅक रॅली पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 17,400 च्या खाली गेला तर तो आणखी कमजोर होऊ शकतो आणि तो 17,330 आणि 17,280 च्या दिशेने जाऊ शकतो असेही ते म्हणाले.

हेही वाचा: ‘या’ शेअरने फक्त वर्षभरात गुंतवणुकदारांचे पैसे केले दुप्पट

शेअर मार्केट

शेअर मार्केट

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

– पॉवर ग्रीड (POWERGRID )

– JSW स्टील (JSWSTEEL)

– कोल इंडिया

– NTPC

– अडानीपोर्ट्स

– ग्लेनमार्क

– भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL)

– एसआरएफ

– गुजरात गॅस (GUJGASLTD)

– हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here