
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’ या संघटनेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
5 तासांपूर्वी
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’ या संघटनेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबतची तक्रार गौतम गंभीरने दिल्ली पोलिसात केली आहे. सध्या दिल्ली पोलिस याची चौकशी करत आहेत.
गंभीरला जीवे मारण्याची धमकी आल्याबद्दल मध्य दिल्लीच्या डीसीपी श्वेता चौहान यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, खासदार गौतम गंभीर यांना इसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार केली आहे. यानंतर गंभीर यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Esakal