'भाजपमध्ये छळ झाला'; माजी खासदाराचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा

गेल्या काही वर्षांपासून पक्षात दूर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी आपण राजीनामा देत आहे असं म्हटलं होतं.

sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

हिमाचल प्रदेशात फतेहपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीला तिकिट न मिळाल्यानं भाजप नेते कृपाल परमार हे नाराज होते. माजी राज्यसभा खासदार कृपाल परमार यांनी मंगळवारी भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवावर चिंतन बैठकीच्या आधी त्यांनी राजीनामा दिला आहे. परमारसुद्धा बैठकीत उपस्थित राहणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून पक्षात दूर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी आपण राजीनामा देत आहे असं म्हटलं होतं.

परमार यांनी पला भाजपमध्ये सहा महिने छळ झाला असं म्हटलं आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदासह सिरमौर जिल्ह्याच्या प्रभारी पदाचा आणि राज्याच्या एक्झिक्युटीव्ह कमिटी सदस्यत्वाचा राजीनामाही त्यांनी दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

कृपाल परमार यांनी राजीनामा देण्याचं कारण स्वतंत्रपणे सांगणार असल्याचं म्हटलं आहे. फतेहपूर विधानसभा मतदारसंघात त्यांना तिकिट मिळेल असं म्हटलं जात होतं. गेल्यावेळी ते काँग्रेसचे तत्कालीन मंत्री सुजान सिंह पठानिया यांच्याविरोधात निवडणूक लढले होते. मात्र यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी बलदेव ठाकूर हे भाजपचे बंडखोरसुद्धा विरोधात होते. नंतर पोटनिवडणुकीत बलदेव ठाकूर यांनाच भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे परमार नाराज होते.

हेही वाचा: केंद्रीय मंत्रिमंडळात आज कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी

कृपाल परमार यांनी तिकिट न मिळाल्यानं नाराज झालो म्हणून राजीनामा दिला आहे असे नाही. तिकिटाचा आणि राजीनाम्याचा संबंध जोडणं योग्य नाही. बऱ्याच काळापासून संघटनेतील वरिष्ठांबाबत तक्रारी आहेत. त्यावर योग्य ती कारवाई होत नसल्यानं उपाध्यक्ष पद सोडत असल्याचं परमार यांनी काल म्हटलं होतं.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here