नेत्रदान
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे जिल्ह्यात नेत्रदानाची स्थिती चिंताजनक बनली आहे. शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ५०० नेत्रदानाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र ते उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले आहे. यामुळे जिल्ह्यात अंधत्वाचे प्रणाम वाढत आहे. ३ हजार दृष्टिहीन बांधव नेत्रदानाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती पुढे आली आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हा विचार न करता बुबुळरोपण, तिरळेपणा, काचबिंदू या अंधत्वाच्या कारणांकडे बघण्याची गरज आहे. नागपुरात २०२०-२१ मध्ये अवघे ९३ नेत्रगोल मिळाले होते. यावर्षी ऑक्टोंबर २०२१ पर्यंत १२७ नेत्रगोल नेत्रदानातून उपलब्ध झाले.

हेही वाचा: ब्रिटनच्या प्रिन्सची 1.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक

२०१८ ते २०२० सालच्या तुलनेत २५ टक्के नेत्रगोल नेत्रदानतून मिळाले. जिल्ह्यातील ३२ नेत्रपेढ्यांमध्ये नेत्रदान स्वीकारले जाते. यात मेडिकल, मेयो, महात्मे नेत्र बँक, लता मंगेशकर हॉस्पिटल, सूरज हॉस्पिटल, माधव नेत्रालय यांच्या पथकाकडून नेत्रदान व बुबुळ प्रत्यारोपण करण्यात येते.

वर्ष मिळालेले नेत्रगोल यांना मिळाली दृष्टी

  • २०१८-१९ = ४९६ १२७

  • २०१९-२० = ४९१ १६४

  • २०२०-२१ = ९३२

  • नोव्हेंबर २०२१ पर्यंत १२७ ३४

जिल्हा अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतो. जिल्ह्याला वार्षिक ५०० चे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार येथील परिस्थिती समाधानकारक आहे. कोरोनामुळे नेत्रदान कमी झाले होते, पण आता परिस्थिती पूर्ववत होऊ लागली आहे. नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. लोकांनी स्वतःहून प्रेरित होऊन नेत्रदानासाठी पुढे यायला हवे

– डॉ.दीपक थेटे, कार्यक्रम अधिकारी, नेत्र जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नागपूरEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here