
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग आज मुंबईत एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर राहिल्या होत्या.
5 तासांपूर्वी
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग आज मुंबईत एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर राहिल्या होत्या. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना यावेळी न्यायालयाने म्हटलं की, जेव्हा जेव्हा नोटिस पाठवण्यात येईल तेव्हा हजर व्हावं लागेल. दरम्यान यावर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, मला कोर्टने बोलावले आणि मी आले नाही असं झालं नाही, उपचार सुरू आहेत, केस सुरू आहे, जेव्हा जेव्हा न्यायालय बोलवेल तेव्हा न्यायालयात येईन.
राजकारणाचे काही मापदंड असतात. हिंदूंचा छळ मांडला जात आहे. मनात श्रद्धा नाही, दुर्भाग्यपूर्ण मनाने ही कारवाई केली जात असल्याचं साध्वी प्रज्ञा सिंग यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. आज विकास होत आहे आणि लोक स्वाभिमानाने जगत आहेत, काँगेसच्या काळात केवळ भ्रष्टाचार होत होता असं म्हणत साध्वी प्रज्ञा सिंग यांनी काँग्रेसवर टीका केली.
साध्वी प्रज्ञा सिंग यांनीही कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्य कशाला म्हणतात ? आता सर्वपरी विकास होत आहे, 2014 पासून खऱ्या अर्थाने लोकांना स्वातंत्र्य मिळालं असं लोकांना वाटतं आहे, त्यांनी ते बोलून दाखवलं त्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे (कंगना विधानावर) राष्ट्रभक्ती व्यक्ती बोलतो तेव्हच प्रश्न उपस्थित केले जातात असे त्यांनी म्हटलं.
देशात कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यावरही साध्वी प्रज्ञा सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णयच मोदी घेतात. CAA देशाच्या हिताचे, NRC बिल अजून आलेच नाही त्याला विरोध का ? अर्थचा अनर्थ करू नये असंही त्यांनी म्हटलं.
Esakal