
5 तासांपूर्वी
लसूण आणि आलं कशाला म्हणतात याबाबत पाकिस्तानच्या मंत्र्यांचा (Pakistan minister viral video) चांगलाच गोंधळ उडालाय. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. लसूण आणि कांद्याचे भाव कमी झाल्याबद्दल मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा: Explainer : पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे का मागे घेतले? वाचा सविस्तर
फवाद चौधरी हे पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत. नुकतीच त्यांनी महागाईसंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी लसणाला उर्दूमध्ये नेमकं काय म्हणतात? हे त्यांना आठवत नव्हतं. उपस्थितांनी त्यांना गार्लिक म्हणजे लसूण असं सूचवलं. तरी मंत्री आपल्याच मतावर ठाम होते. त्यांनी गार्लिक म्हणजे अदरक असा उल्लेख केला. यावरून मंत्री फवाद हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.
मंत्री फवाद यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी मंत्री फवाद यांची खिल्ली उडविली, तर काहींनी आलं आणि लसणामध्ये आम्ही नेहमी गोंधळून जातो, असं म्हटलं. एका युजरने आजपासून ”गार्लिकवाली चाय” असं म्हटलंय, तर एकाने मंत्र्यांचा आत्मविश्वास किती जबरदस्त आहे, असं म्हणत खिल्ली उडविली. तसेच एकाने त्यांच्या मंत्रिपदावरून खिल्ली उडवत, मंत्र्यांना अधिकची माहिती असल्याचे म्हटले आहे.
Esakal