सोलापूर जिल्हा परीषदेचे दोन कर्मचारी निलंबित

झेडपीचे दोन कर्मचारी निलंबित

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी बसवेश्वर स्वामी यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले होते. सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुहास चेळेकर यांच्यावर लाच मागीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी निलंबित केले आहे.

चेळेकर व स्वामी या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाचा अहवाल लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षकांनी जिल्हा परिषद प्रशासनाला पाठविला होता. या अहवालानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने या दोन्ही कर्मचाऱ्यांना १७ नोव्हेंबर रोजी निलंबित केले आहे. बसवेश्वर स्वामी यांना ८ नोव्हेंबरपासून व सुहास चेळेकर यांना १० नोव्हेंबर पासून निलंबित केले असल्याची माहितीही सीईओ स्वामी यांनी दिली.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here