कोथंबीर, मेथी मातीमोल : चाळीस हजार जुड्या कचरा कुंडीत
sakal_logo

द्वारे

रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

पुणे (नारायणगाव) : नारायणगाव उपबजारात कोथंबीर,मेथी व शेपू या भाजीपाल्याचे भाव मातीमोल झाल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत. भाव नसल्याने मंगळवारी(ता.२३)  सायंकाळी विक्रीसाठी आणलेल्या सुमारे चाळीस हजार जुड्या नारायणगाव उपबजार आवारात सोडून शेतकऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला.या मुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा झाला आहे.नुकत्याच झालेल्या पावसामुळे कोथंबीर,मेथी व शेपू ओली झाल्याने भाजीपाला सडण्याचे प्रमाण वाढल्याने बाजारभावात घट झाली असल्याची माहिती अडतदार कमलाकर वाजगे यांनी दिली.

मंगळवारी रात्री उपबाजारात कोथंबीर,मेथी व शेपूच्या ४ लाख ६९ हजार ८ ०० जुडयांची विक्रमी आवक झाली होती. लिलावात चांगल्या प्रतीच्या कोथंबीर,मेथी व शेपूच्या जुडीला सरासरी पन्नास पैसे ते पाच रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साठल्याने काढणी नंतर कोथंबीर,मेथी व शेपू

हेही वाचा: ST STRIKE: कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढीचा प्रस्ताव

सडण्याचे प्रमाण वाढले आहे. येथील उपबजारात रात्री खरेदी केलेला भाजीपाला मुंबई येथे बाजारात सकाळी विक्रीसाठी जातो.दरम्यानच्या आठ ते दहा तासात गरम होऊन कोथंबीर,मेथी व शेपू सडण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुळे व्यापाऱ्यांनी मर्यादित भाजीपाला खरेदी केल्याने लिलाव न झालेल्या सुमारे चाळीस हजार जुड्या उपबजारात सोडून शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने घराचा रस्ता धरावा लागला.या मुळे काढणी मजुरी, वाहतूक व भांडवली खर्च असा एकरी सुमारे चाळीस हजार रुपयांचा तोटा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here