विदर्भ
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

पोंभुर्णा: कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना बुधवारी (ता. २४) दुपारी २ वाजता पोंभुर्णा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कसरगट्टा बिटातील कविटबोळी शेतशिवारात घडली. मृत महिलेचे नाव बेबीबाई हनुमान धोडरे (वय ५५, रा. कसरगट्टा) असे आहे.

कसरगट्टा गावालगत असलेल्या कविठबोळी येथे गंगाराम मोहन धोडरे यांचे शेत आहे. सध्या कापूस वेचणी सुरू आहे. बेबीबाई धोडरे या मजुरीने कापूस वेचण्याकरिता शेतात गेल्या होत्या. कापूस वेचणी करीत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने बेबीबाईवर हल्ला चढविला. या घटनेची माहिती वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृत महिलेला शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे पाठविण्यात आले.

आणखी किती बळी?

काही दिवसांपासून पोंभुर्णाजवळ असलेल्या कविटबोळी येथे शेतकऱ्यांना वाघ आढळत होता. दोन दिवसांपूर्वी वाघाने दोन बैलांना ठार केले होते. याची माहिती देऊनही वनविभागाने वेळीच लक्ष दिले नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचे गावकरी बोलत आहेत. या वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here