
5 तासांपूर्वी
राजुरा : तालुक्यातील कोहपरा येथील नरेश गणेश विधे (वय २६) या युवकाने शेतीवर असलेले कर्ज व नापिकीला कंटाळून घरालगतच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (दि. २३) सायंकाळी ५ पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
वडीलाच्या नावाने चार एकर शेती आहे या शेतीवर वडिलांनी सेवा सहकारी पतसंस्थेचे ऐंशी हजार रुपये, बचत गटाचे दोन लाख रुपये कर्ज उचल केले असून याच वर्षात बहिणीचे लग्न केल्यामुळे त्याचे सुद्धा कर्ज असल्याने व यावर्षी झालेल्या नपिकीमुळे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून त्यांनी सायंकाळच्या सुमारास गोठ्यात जाऊन गळफास घेतली. वडील कामानिमित्य गोठ्यात गेले असता मुलगा घळफास घेऊन असल्याचे दिसताच आजूबाजूच्या नागरिकांना घटनेची माहिती दिली. याबाबत विरूर (स्टे.) पोलिसांना घटनेची माहिती दिली असता समोरील तपास पोलीस करीत आहे.
हेही वाचा: वानखेडेंच्या नावाने ट्विटरवर बनावट खातं ; पाहा व्हिडीओ
आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता, त्याच्या पच्छात्य आई वडील असून घरातील कर्ता मुलगा गेल्याने विधे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. आई वडिलांच्या एकुलता एक मुलगा निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
Esakal