
देहू नगरपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले
२४ नोव्हेंबर २०२१
देहू – राज्यातील १०५ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी (ता. २४) राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील नवनिर्मित झालेल्या देहू नगरपंयातीची निवडणूक येत्या २१ डिसेंबरला होणार आहे. यात सतरा जागांसाठी निवडणूक होणार आहे. कोरोनानुळे देहू नगरपंयातीची निवडणूक वर्षभर लांबली. मात्र, निवडणूक आयोगाकडून नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यात देहू नगरपंचायतीचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २९ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
हेही वाचा: दोनशे शाळांत दुबार विद्यार्थी; अतिरिक्त शिक्षक सापडण्याची शक्यता
३० नोव्हेंबरला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. नामनिर्देशन पत्र वेबसाईडवर भरण्यासाठी १ डिसेंबर ते ७ डिसेबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत भरता येतील. वरील नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचा कालावधी १ डिंसेबर ते ७ डिसेंबर सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत शनिवार व रविवार वगळता राहणार आहे. अर्जाची छाननी व वैध नावे अर्ज ८ डिसेंबरला सकाळी अकरा वाजता जाहीर होणार आहे. १३ डिसेंबरला अर्ज माघारीची मुदत आहे. निवडणूक चिन्ह देणे व अंतिम यादी प्रसिद्ध करणेसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवसाच्या दुसऱ्या दिवशी मुदत आहे. २१ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होणार आहे. २२ डिसेंबरला सकाळी १० वाजता मतदान मोजणीस सुरवात होईल. निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
Esakal