bsnl

‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांची विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

पुणे – भारत सरकारची सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडमधील (बीएसएनएल)अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २४) विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली.

अखिल भारतीय पदवीधर अभियंता आणि दूरसंचार अधिकारी संघटनेतर्फे (ऐआयजीइटीओ) सातारा रस्त्यावरील बीएसएनएलच्या मुख्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. बीएसएनएलच्या नवीन मनुष्यबळाच्या धोरणांतर्गत अधिकाऱ्यांची कमी केलेली पदे पुर्ववत कायम ठेवावीत, पदोन्नतीच्या करण्यात आलेल्या मर्यादित संधी रद्द करून पुन्हा पूर्वीप्रमाणेच पदोन्नतीचे धोरण कायम ठेवावे आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यासाठी हे आंदोलन कऱण्यात आले. यावेळी नवीन धोरणाचा निषेधही करण्यात आला. नवीन धोरणामध्ये बाह्य भरतीद्वारे अधिकारी घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी संबंधित धोरणाच्या प्रती जाळून निषेध नोंदवला.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here