ममता बॅनर्जी

माजी मुख्यमत्र्यांसह काँग्रेसच्या १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

पश्चिम बंगालमध्ये सत्ता कायम ठेवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banarjee) आता देशातील इतर राज्यातील राजकारणात उतरत आहेत. यात त्यांनी गोव्याच्या विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेतही दिले आहे. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला (Congress) धक्के देण्यास सुरुवात केली आहे. किर्ती आझाद (Kirti Azad) यांच्यासह इतर नेत्यांच्या तृणमूल (Trinmool Congress) प्रवेशानंतर मेघालयातही मोठा धक्का दिला आहे. मेघालयातील (Meghalaya) काँग्रेसच्या १७ पैकी १२ आमदारांनी तृमणूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा (Mukul Sangama) यांचाही समावेश आहे. (meghalaya 12 congress mla join trinamool congress)

माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्याशी सप्टेंबरमध्ये चर्चा केली होती. मात्र नेमकी कधी भेट झाली याबद्दल माहिती सांगण्यात आलेली नाही. संगमा यांनी त्यांची भेट अभिषेक बॅनर्जी यांच्याशी झाल्याचं सांगितलं होतं. विधानसभेत विरोधीपक्ष नेते विंसेट पाला यांच्यामुळे ते त्रासले होते अशी माहिती आता मिळत आहे.

ममता बॅनर्जी यांनी पक्षविस्ताराकडे लक्ष दिलं असून गेल्या काही महिन्यात काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा तृणमूल प्रवेश झाला आहे. यात दिग्गज आणि ओळखीचे चेहरे तृणमूलमध्ये आले आहेत. अजुनही काही नेते तृणमूलमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यता आहे. याआधी २३ नोव्हेंबरला काँग्रेसच्या किर्ती आझाद यांनी तृणमूल प्रवेश केला होता. तर हरियाणातील अशोक तंवर, पवन वर्मा यांनीही टीएमसी प्रवेश केला. दिल्लीत ममता बॅनर्जी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले होते.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here