पाकिस्तान
sakal_logo

द्वारे

संघ-इश

नवी दिल्लीः सीमेवर ड्रोन पाठवून आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल बीएसएफच्या (Border Security Force) शिष्टमंडळाने पाकिस्तानकडे (pakistan) तीव्र निषेध नोंदविला आणि अशा कारवायांपासून दूर राहण्यास सांगितले. यावेळी भारताकडून काय सांगण्यात आले?

पाकिस्तानकडून ड्रोन ऑपरेशन्स आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा

जकात चौकीवर पाकिस्तानी रेंजर्ससोबत कमांडंट स्तरावरील बैठकीदरम्यान हा निषेध नोंदवण्यात आला. बैठकीदरम्यान, दोन्ही सीमा सुरक्षा दलांच्या कमांडर्सनी सीमेवरील खांबांची देखभाल आणि सीमेवरील पायाभूत सुविधा, पाकिस्तानकडून ड्रोन ऑपरेशन्स आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा केली गेली. सीमेवर शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी पावलं उचलण्यासाठी दोन्ही कमांडर सहमत असल्याचं बीएसएफच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

हेही वाचा: ST Workers Strike | पगारवाढीचे गाजर नको; संपकरी विलिनीकरणावर ठाम

3 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील रामबाग भागात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील लाल चौक-विमानतळ मार्गावरील रामबाग पुलाजवळ झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक, टीआरएफ कमांडर मेहरान यासीन हा श्रीनगरमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांच्या हत्येत सामील होता. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख- TRF कमांडर मेहरान यासीन शल्ला, मंजूर अहमद मीर आणि अराफत अहमद शेख, अशी आहे. ही माहिती काश्मीर पोलीसांनी दिली. बीएसएफच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कमांडंट अजय सूर्यवंशी आणि पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व 13 विंग चिनाब रेंजर्सचे विंग कमांडर लेफ्टनंट कर्नल अकील यांनी केले.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here