स्वीडन दुपारी
sakal_logo

द्वारे

संघ-इश

स्वीडन (Sweden) देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानांनी (sweden first woman pm magdalena anderson) नियुक्ती झाली खरी, पण काही तासांतच राजीनामा दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. असं काय घडलं की त्यांना काही तासांतच राजीनामा द्यावा लागला?

राजकीय खेळीला बळी

54 वर्षीय मॅग्डालेना अँडरस सोशल डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांनी 1996 मध्ये तत्कालीन पंतप्रधान गोरान पर्सनच्या राजकीय सल्लागार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी गेली सात वर्ष स्वीडनच्या अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. मॅग्डालेना अँडरसन (Magdalena Andersson) यांना बुधवारी पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले होते, मात्र त्या सहयोगी पक्षाच्या राजकीय खेळीला बळी पडल्या.

हेही वाचा: समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा आणखी एक पुरावा! मलिकांचा बॉम्ब

मॅग्डालेना अँडरसने युती केलेल्या, ग्रीन्स पार्टीने (Green Party) सांगितले की राइट विंग पार्टीसोबत प्रथमच अर्थसंकल्प तयार केला गेला होता, जो त्यांच्यासाठी अस्वीकार्य होते. अँडरसनची बुधवारी पंतप्रधान म्हणून निवड झाली होती. कारण स्वीडिश कायद्यानुसार, त्यांना फक्त विरोधात मतदान न करणाऱ्या बहुसंख्य खासदारांची आवश्यकता होती. त्या सोशल डेमोक्रॅट पक्षाच्या (Social Democratic Party) नेत्या आहेत. स्वीडनमध्ये तब्बल 100 वर्षांनंतर एका महिला नेत्याला संसदेत मतं मिळाली होती. 54 वर्षीय सोशल डेमोक्रॅट नेत्या मॅग्डालेना अँडरसन यांना संसदेने स्टैंडिंग ओवेशनही दिले होते. मात्र, त्यांच पंतप्रधान पद काही तासांताठीच राहीलं. अल्पसंख्याक सरकारच्या प्रमुखपदी त्यांची निवड शेवटच्या क्षणी विरोधी पक्षाशासोबत स्वीडिश लोकांसाठी उच्च निवृत्ती वेतनाबाबत करारानंतर झाली होती. ज्यानंतर अँडरसनला ग्रीन्स पार्टीने पाठींबा दिला होता.

हेही वाचा: मोदी सरकार कुठे-कुठे फेल? भाजपच्या खासदारानेच दिले रिपोर्ट कार्ड

अँडरसने युती केलेला पक्ष सरकारमधून बाहेर पडला आणि अँडरसनचे बजेट पास होऊ शकले नाही. त्यांना नंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. संसदेने विरोधकांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पासाठी मतदान केले. “मी स्पीकरला सांगितले आहे की मला राजीनामा द्यायचा आहे, अँडरसन यांनी मिडीयाला सांगितले. अँडरसन म्हणाल्या की, सरकार स्थापन करुन पुन्हा पंतप्रधान होण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here