
सायंकाळी घरी परतले असता जेवून आलेल्या सर्वांच्या पोटात दुखू लागले.
5 तासांपूर्वी
खानापूर : बंकी (ता. खानापूर) येथील एकाच कुटुंबातील अकरा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी (ता. २४) घडली. या सर्वांवर नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. बेकवाड ग्राम पंचाय हद्दीत येणाऱ्या बंकी गावातील अब्दुल जमादार (वय 6५) यांचे अकरा जणांचे कुटुंब मंगळवारी एम. के. हुबळी येथे पाहुण्यांकडे जेवणासाठी गेले होते. ते सायंकाळी घरी परतले असता जेवून आलेल्या सर्वांच्या पोटात दुखू लागले.
वेदना होऊ लागल्याने यातील त्यांची पत्नी नावाजबी (६०), मुले महमद, (४०) सारफराज (३५) शयनज (३२) व नातवंडे शिबरन (१२), साहिर (१४), सहना (८), जुहूर (८), आलीय (११), अजाण (४) आदींची प्रकृती अत्यवस्थ झाली. लागलीच गावकऱ्यांनी त्यांना नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टराच्याकडून उपचार सुरू करण्यात आले. यातील काहींची प्रकृती स्थिर झाली आहे. तर काहींवर अद्याप उपचार सुरू आहेत. खानापूरचे आरोग्यधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी तातडीने रुग्णांची भेट घेऊन पाहणी केली तसेच यासंदर्भात नंदगड पोलिसांना माहिती दिली आहे.
हेही वाचा: जनता दलामुळेच ‘मॅजिक फिगर’ ओलांडली – सतेज पाटील
Esakal