
5 तासांपूर्वी
मुंबई : गेल्या २०१३ मध्ये झालेल्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी (Shakti Mill Gangrape Case) मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल बदलला (Shakti Mill Gangrape Case Bombay High Court Result) असून तीन आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. पण, याप्रकरणात आतापर्यंत काय घडलं? ते पाहुयात.
आतापर्यंत नेमकं काय घडलं? –
-
२२ ऑगस्ट २०१३ : मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट ला सायंकाळी एक महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला होता.
-
२३ ऑगस्ट २०१३ : देशभरातील प्रसार माध्यमांमधून टिका झाल्यानंतर मुंबई पोलिस दल आरोपींच्या शोधासाठी कार्यरत.
-
२३ ऑगस्ट २०१३ : अवघ्या चार तासांत मुंबई पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला त्याच्या मध्य मुंबईतील राहत्या घरातून अटक करून या प्रकरणाचा छडा लावला. आठवडाभरात इतर सर्व आरोपींना अटक होते.
-
३ सप्टेंबर २०१३ : मुंबईतील एका टेलिफोन ऑपरेटर तरुणीनेही शक्ती मील परिसरात याच आरोपींकडून जुलै महिन्यात बलात्कार झाला होता, अशी तक्रार केली.
-
१९ सप्टेंबर २०१३ : मुंबई पोलिसांनी याप्रकरणी 600 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. पाच आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे यासह एकूण १३ आरोप ठेवण्यात आले होते.
-
८ ऑक्टोबर २०१३ : मुंबई पोलिसांनी टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील बलात्कार प्रकरणी ३६२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
-
११ ऑक्टोबर २०१३ : शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण आणि ऑपरेटर तरुणी बलात्कार प्रकरण दोन्ही प्रकरणी आरोपींवर आरोप निश्चित
-
18 ऑक्टोबर 2013 : पीडित तरुणीने आपल्यावर बेतलेला प्रसंग न्यायालयात विशद करताना आरोपींना ओळखले. मात्र, तणावामुळे ती साक्ष देतानाच बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात न्यावे लागले. परिणामी सुनावणी तहकूब करण्यात आली.
-
५ मार्च २०१४ : आरोपींचा जबाब न्यायालयाने नोंदविला
-
४ डिसेंबर २०१४ : मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणी आरोपी विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला शिक्षा सुनावली होती. सिराज खानला जन्मठेप, तर इतर तीन आरोपीना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. एका अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात आले होते.
-
डिसेंबर २०१४ : सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत आरोपींची उच्च न्यायालयात धाव
-
२५ नोव्हेंबर २०१९ : शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल बदलला असून सत्र न्यायालायने आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलिम अन्सारी यांना दिलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे.
Esakal