कोरोना लस
sakal_logo

द्वारे

संघ-इश

पुणे : सध्या कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये मोठी घट जरी होताना दिसत असली, तरी कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र अशातच महाराष्ट्र राज्यातून एक मोठी बातमी समोर येतेय. ती म्हणजे, चक्क 92.5 लाख लोकांनी निष्काळजीपणा केला असून एक धक्कादायक आकडेवारी समोर येतेय. जाणून घ्या सविस्तर…

92.5 लाख लोकांकडून निष्काळजीपणा

शासकीय माहितीनुसार, सध्या दररोज देशभरात सरासरी 10 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. यामागे लोकांचा निष्काळजीपणा असल्याचं दिसून येतेय. राज्यात तब्बल 92.5 लाख लोकांनी अद्याप लसीचा (Covid-19 Vaccine) दुसरा डोस (Second Dose) घेतलेला नाही. राज्य सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 77 लाख लोकांनी कोविशील्डचा दुसरा डोस घेतलेला नाही. तर कोवॅक्सिन घेणारे 15 लाख लोक अजून दुसरा डोस घेण्यापर्यंत पोहोचलेले नाहीत.

….तर दुसरा डोस अँटीबॉडी बनवतो

टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, लोकांनी लक्षात ठेवावं की लसीचा पहिला डोस त्यांना व्हायरसशी लढण्यासाठी तयार करतो. तर दुसरा डोस अँटीबॉडी बनवतो. त्यामुळे दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करू नये. महाराष्ट्रात आतापर्यंत 18 वर्षांवरील 39 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर 78% लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दिवाळीत लाखो लोक राज्याबाहेर गेल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत, अनेकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. बरेच लोक विसरले.

हेही वाचा: एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम

…त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली

सध्या देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचं म्हटल्यानं काही लोकांनी या लसीकडे दुर्लक्ष केलं. ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत त्यांना लस घेण्यास सांगितलं जात आहे.

हेही वाचा: त्रिपुरात तातडीने CAPF च्या तुकड्या पाठवा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देशEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here