आमदार-अमित-साटम
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव : झाडे वाचावीत म्हणून आरेमधील प्रस्तावित मेट्रो कार शेड (Aarey metro car shed) शिवसेनेने (shivsena) अन्य ठिकाणी हलवले; मात्र त्यांची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या (bmc) वृक्ष प्राधिकरणाने मागील दहा वर्षांत सुमारे ३९ हजार वृक्ष तोडण्याची परवानगी (permission for cutting trees) दिली. त्यातील २१ हजार झाडे केवळ खासगी विकसकांच्या प्रकल्पाकरिता (Private Developer projects) तोडण्याची परवानगी दिली, असा आरोप अंधेरीतील भाजपचे आमदार अमित साटम (Amit satam) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : नवजात मुलाला रुग्णालयात सोडून मातेचे पलायन; गुन्हा दाखल

साटम यांनी माहिती अधिकारांतर्गत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागातून गेल्या दहा वर्षांत पालिकेने किती झाडांना तोडण्यास परवानगी दिली याची माहिती मिळवली आहे. त्यावरून शिवसेनेवर टीका करत आदित्य ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला मेट्रो प्रकल्प आपण बंद पडला. आता ३९ हजार वृक्षांच्या कत्तलीला परवानग्या दिल्याबद्दल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here