
5 तासांपूर्वी
डोंबिवली : मुंबईतील चांदीवली परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला डोंबिवली तील दोघा भामट्यानी 20 लाखाला फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. फेसमास्क विकत देण्याच्या बहाण्याने या भामट्यानी त्यांच्या कडून पैसे घेतले. मात्र ना फेसमास्क दिले ना पैसे. या फसवणूक प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी आदित्य पाठक (वय 29) व सुहास पाठक (वय 65) यांना अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिमेत शास्त्रीनगर परिसरात राहणारे पथक यांनी मुंबईतील व्यापारी ताहा सिद्दीकी यांच्याशी जून 2020 मध्ये फेसपॅक विक्रीचा व्यवहार केला होता. फेसपॅक देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडू। पाठक यांनी 20 लाख रुपये उकळले. पैसे देऊनही फेसपॅक न दिल्याने तसेच पैसे परत मागितल्यानंतर बंद खात्याचे धनादेश देत सिद्दीकी यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिद्दीकी यांनी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा: ‘कूछ तो रापचीक..’ म्हणत रवीने पोस्ट केला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो
पोलीसांनी शनिवारी दोघांना अटक केली. अशाच पद्धतीने पाठक यांनी औरंगाबाद येथे एकाची व इतर ठिकाणी काही जणांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पाठक यांनी सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Esakal